दहा हजार सॅनिटरी नॅपकिनचे शाळेतील मुलींना वाटप

sanitary napkin distribution
sanitary napkin distribution

वारजे माळवाडी : शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन स्वस्त दरात देण्याची भूमिका शासन पातळीवर घेतली आहे. त्यापूर्वीच आपली सामाजिक जबाबदारी ओळखून भाजपचे पदाधिकारी, उद्योजक व सामाजिक संघटना यांनि मिळून १०हजार सॅनिटरी नॅपकिन मोफत दिले जाणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून या स्तुत्य उपक्रमाला वारजे माळवाडी येथून सुरवात झाली.

वारजे माळवाडी येथील कै.शामराव श्रीपती बराटे मनपा शाळा क्रमांक १६१येथील २००विद्यार्थींनींना एक महिन्याकरिता लागणारे सॅनिटरी पॅडसचे वाटप गुरुवारी करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व प्रभाग समितीचे माजी स्वीकृत सदस्य सचीन दशरथ दांगट  इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रा.लि.आणि आकांक्षा नारी मंच यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम खडकवासला विधानसभा मतदार संघात हाती घेतला आहे.

यानंतर, नॅपकिन वाटप केल्यानंतर येथील मुलींना डाॅ.हेमांगी पाटसकर यांनी मासीक पाळी म्हणजे काय, त्यावेळी, कापड वापरण्याची पारंपरिक पध्दतीचे तोटे, सॅनिटरी पॅडस का वापरायचे, पाळीच्या दिवसात घ्यावयाची स्वच्छतेची काळजी, पॅडस वापरणे तसेच त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी. याची माहिती दिली. या प्रसंगी इंडोटेक कंपनीच्या नवीन व्हेडिंग मशीन वापराची माहिती आणि प्रात्यक्षिक मुलींना दाखविण्यात आले .

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुनंदा हांडे, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड.अस्मिता जोशी, डाॅ.हेमांगी पाटसकर , तनिष्का पुनम चोरडिया, शाळा सुधार समितीच्या रेखा कलाल, इंडोटेकच्या हेमलता जंजिरे, वंदना पेठकर, सोनाली पाटील, इंडोटेक टीम , इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यतच्या १५० विद्यार्थीनी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, सेवक वर्ग आदि उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com