आश्रमशाळेतील तीनशे विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणचा संकल्प

दत्ता म्हसकर
गुरुवार, 22 मार्च 2018

जुन्नर - सोनावळे ता.जुन्नर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात शालेय परिसरात तीनशे झाडे लावण्यात येणार आहेत. जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी  जयवंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हा संकल्प जाहीर केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळचे बातमीदार दत्ता म्हसकर व प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक रमेश खरमाळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. रमेश खरमाळे, सागर चुटके, तेजस्विनी भालेकर यांनी वन व वन्य प्राणी याचे आपल्या जीवनातील महत्व याविषयी माहिती दिली. मुख्यध्यापिका अलका डुंबरे, युवराज कोकणे, गंगाधर कुटे, केशव करपे आदींनी विचार व्यक्त केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थांना यावेळी गौरविण्यात आले.

प्रत्येक मुलाने एक झाड लावून ते जगवले पाहिजे ही संकल्पना मुलांकडून साकारली जाईल असे आश्वासनही शाळेकडून देण्यात आले.  

कार्यक्रमाचे सुत्र संचालन व्ही.एस.गर्जे यांनी केले. संजय जोशी, केशव पानसरे, इंद्रजित वीर,शिवाजी गुंजाळ, कमल भोर, के.के.गर्जे, के.व्ही, ताटे, हर्षल वाळुंजकर आदी शिक्षक उपस्थित होते.

Web Title: marathi news school tree plantation