जुन्नर तालुक्यात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Science-exhibition
Science-exhibition

जुन्नर : पुणे जिल्हा परिषद, पुणे पंचायत समिती, जुन्नर व शिवनेरी फाऊंडेशन खानापूर यांच्या संयुक्त विदयमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ मयुरेश कैलास शेटे आणि जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते झाले. कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनेरी फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष शुभंकर कणसे होते. 

गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ म्हणाले, जुन्नर तालुका शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असून आपले अनेक प्रकल्प विभाग व राज्यस्तरावर पोहोचले आहेत. शिक्षकांनी केलेल्या कामाचे हे फलित असून मयुरेश शेटे यांसारखे शास्त्रज्ञ इस्त्रोला जुन्नर तालुकयाने दिले आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. विज्ञानप्रदर्शनासंबंधित माहिती देऊन मुलांना विज्ञानप्रदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्था केल्याबद्दल शिवनेरी फाउंडेशचे कौतुक केले.

मयुरेश शेटे म्हणाले, बालवयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहुल दाखविले पाहिजे. त्यांनी जुन्न्नर तालुक्यातच जिल्हा परिषद शाळेत शिकून शास्त्रज्ञ होता येते हे दाखवून दिले असून विद्यार्थ्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ऩिसर्गातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान कसे दडले आहे याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. 

गटविकास अधिकारी यांनी हे प्रदर्शन सुनियोजितरित्या आयोजित केले असून मुलांनी व शाळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. बालपणी शाळेत शिकतानाचे अनुभूव त्यांनी सांगितले. जाता जाता त्यांनी मुलांना स्वच्छतेचा संदेश दिला. 
या विज्ञान प्रदर्शनामध्ये सकाळपासून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. पाहुण्यांनी प्रकल्पांना भेटी देऊन त्यांची माहिती घेतली. मुलांची उत्सुकता आणि जिज्ञासा पाहून आनंद व्यक्त केला.

या प्रदर्शनामध्ये मुलांचे 300 प्रकल्प मांडण्यात आले असून लोकसंख्या शिक्षण प्राथमिक शिक्षक माध्यामिक शिक्षक तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्राथमिक व माध्यमिक व परिचर यांचे मिळून 16 प्रकल्प असे 316 प्रकल्प मांडण्यात आले आहेत.

याप्रसंगी शिवनेरी फाऊंडेशनच्या श्रध्दा कणसे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र गणफुले, शिक्षणविस्तार अधिकारी किसन खोडदे, अशोक लांडे, अनिता शिंदे जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष विनायक ढोले, जुन्नर तालुका शिक्षक समिती अध्यक्ष बाळासाहेब लांघी, शिवनेरी फाऊंडेशनचे कॅम्पस इन्चार्ज राजेंद्र मुरादे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले व आभार जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे सचिव टी. आर. वामन यांनी मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com