‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर, हर महादेव’च्या जयघोषात शहर आणि परिसरात संघटना, संस्थांतर्फे विविध उपक्रमांद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. 

पुणे - ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर, हर महादेव’च्या जयघोषात शहर आणि परिसरात संघटना, संस्थांतर्फे विविध उपक्रमांद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. 

शहर काँग्रेस कमिटीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी युवा नेता योगेश भोकरे, बबलू कोळी, दिनेश शिर्के, बाबा पवार, प्रसाद सपकाळ उपस्थित होते. शहर काँग्रेस क्रीडा सेलतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सेलचे अध्यक्ष सचिन सावंत, अक्षय सोनवणे, रोहित गुरव, नितीन जोशी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पूजा झोळ, प्रशांत धुमाळ, ॲड. मिलिंद पवार, छाया खैरनार उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर, शीतल चव्हाण, सविता पाटील, भारती वांजळे उपस्थित होत्या. 

जय भवानी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट व महिला मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थापिका राधिका मखमले, कल्पना उनवळे, संतोष व्हावळ उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षातर्फे विविध साहसी खेळ, पोवाडा, शायरी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले; तसेच नवजीवन अंध-अपंग संस्थेतील ४० अंध मुलांना काठीवाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक सम्राट थोरात, पक्षाचे अध्यक्ष सागर आल्हाट उपस्थित होते. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे शिव स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष रवींद्र माळवदकर, योगेश निंबाळकर, नितीन काळे, अतुल पवार, अजय गायकवाड उपस्थित होते. मुस्लिम समाजातर्फे लाल महाल येथील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहर सरचिटणीस इसाक पानसरे, शंतनू खिलारे पाटील, आरिफ मुजावर उपस्थित होते. पर्वती विधानसभा मतदारसंघातर्फे शिवसैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार उदय सामंत, महादेव बाबर, बाळासाहेब ओसवाल, सूरज लोखंडे उपस्थित होते. मुस्लिम मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्‍ताक पटेल, पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासचे विश्‍वस्त डॉ. मिलिंद भोई, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर, सदाशिव कुंदेन, इस्माईल तांबोळी उपस्थित होते. हमारी अपनी पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवनकुमार गुप्ता, शहराध्यक्ष राजेश अग्रवाल, महासचिव सचिन चव्हाण उपस्थित होते. 

दलित महासंघातर्फे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, सुभाष शेंडगे, सारिका नेटके, सुहास नाईक उपस्थित होते. अखिल भारतीय महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथे शिवमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन, सन्मान सोहळा, व्याख्यान, दीपोत्सव, मशाल उत्सव, पालखी मिरवणूक व पाळणा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. भारिप बहुजन महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महासंघाचे प्रदेश महासचिव वसंत साळवे, नागेश भोसले, ॲड. किरण कदम, दीपक ओहोळ उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष प्रभाग १७ च्या नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी तेजेंद्र कोंढरे, निखिल जाधव, चेतन जाधव उपस्थित होते. 

के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे अभिवादन मिरवणूक काढण्यात आली. शिवनेरी ढोल पथकाच्या वादनानंतर संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी खडी मशिन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गायकवाड, संस्थेचे संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. विजय काखंडकी, व्यवस्थापकीय संचालिका विभावरी जाधव, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. विजय वाढई उपस्थित होते.

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन’ तर्फे अभिवादन
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अल्पसंख्याक बहुजन समाजातील दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी केले. संस्थेच्या कला महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘समतावादी छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आधारित ‘बारा बलुतेदार’ हा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. मिरवणुकीत दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशा पथक, तुतारी, नगारे, छत्रपती शिवाजी महाराजांची तैलचित्रे असलेली गाडी सहभागी झाली होती. मिरवणुकीत शाहीद इनामदार, वाहिद बियाबानी, सिकंदर पटेल, शाहीद मुनीर शेख, डॉ. शैला बूटवाला, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे उपस्थित होते. 

Web Title: marathi news shiv jayanti pune