मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर यंदा शिवनेरीवर उतरणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवावे लागणार आहे. तेथून पुढे पायऱ्यांनी किल्ल्यावर जावे लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

शिवनेरी किल्ल्यावरील हेलिपॅडची जागा दुसरीकडे स्थलांतरित करण्याची सूचना पुरातत्त्व विभागाने केली होती. शिवनेरीवरील राष्ट्रीय स्मारकाला धोका असल्याच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या शिवजयंतीसाठी फक्त फडणवीस यांचे हेलिकॉप्टर गडावर उतरण्यास पुरातत्त्व खात्याने परवानगी दिली आहे. 

शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टरने उतरण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे पत्र काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे, अशी माहितीही मिळाली आहे.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी गडावर जाऊन समारंभाच्या तयारीची पाहणी केली. या बाबत निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास पुरातत्त्व विभागाने मान्यता दिली आहे. इतर महत्त्वाच्या व्यक्तींनीही त्यासाठी परवानगी मागितली आहे. संबंधितांचे अर्ज पुरातत्त्व विभागाकडे पाठविले आहेत.’’

Web Title: marathi news shivneri fort devendra fadnavis maharashtra CM helicopter