महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पुणे - ""खासगी संगीत कंपनीची जाहिरात करण्यापेक्षा राज्यातील प्रदूषित नद्या वाचविणे जास्त महत्त्वाचे काम आहे. त्याचे भान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. "महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?' असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

एम्प्रेस गार्डनमधील साडेदहा एकर जागेवर सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा निर्णय आणि त्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी खासदार सुळे यांनी गार्डनला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ""मुख्यमंत्री हे पद महनीय आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी उत्तम कलाकार आहेत. त्यांना त्यांचे करिअर करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आम्ही कोणीही काही बोलू शकत नाही. त्यांच्या करिअरला आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेली जाहिरात खासगी संगीत कंपनीच्या साहाय्याने केली आहे. नदी वाचविण्यासाठी केलेल्या त्या जाहिरातीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महापालिका आयुक्त आहेत. परंतु मुंबईचे पोलिस आयुक्त आणि नद्या स्वच्छतेचा काय संबंध हे अद्याप कळालेले नाही. नद्या वाचविणे महत्त्वाचे आहेच, परंतु त्याबरोबरच कुपोषण, मराठी शाळा असे गंभीर विषय राज्य सरकारसमोर आहेत.'' 

मराठीचा अपमान करण्याचे कारस्थान 
""भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा मराठी भाषेवर काहीतरी राग दिसतो. राज्यातील तब्बल 1300 हून अधिक मराठी शाळा बंद करण्याचा कट सरकारने रचला आहे. सातत्याने मराठी भाषेला विरोध केला जात आहे. भाषेचा अपमान करण्याचे कारस्थान हे सरकार सातत्याने करत आहे,'' अशी टिप्पणी खासदार सुळे यांनी यावेळी केली.

Web Title: marathi news supriysa sule maharashtra