'बंदे मुल्क' सुरगाणा संस्थानाचा इतिहास

सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

शिवजयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सर्व सरदार घराण्यांना एकत्र आणुन रथयात्रा काढण्यात येते. या रथयात्रेत सहभागी झालेल्या श्रीमंत धारपवार प्रतिष्ठानच्या सागर पवार आणि सुरगाणा प्रांताचे धारपवार घराण्याचे वंशज श्रीमंत रोहीतराजे देशमुख पवार यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. पवार घराण्याचा तसेच सुरगाणा संस्थानाचा इतिहास याबद्दल रोहितराजे पवार यांनी माहिती दिली. 

पुणे | शिवजयंती निमित्ताने शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सर्व सरदार घराण्यांना एकत्र आणुन रथयात्रा काढण्यात येते. या रथयात्रेत सहभागी झालेल्या श्रीमंत धारपवार प्रतिष्ठानच्या सागर पवार आणि सुरगाणा प्रांताचे धारपवार घराण्याचे वंशज श्रीमंत रोहीतराजे देशमुख पवार यांनी 'सकाळ'शी संवाद साधला. पवार घराण्याचा तसेच सुरगाणा संस्थानाचा इतिहास याबद्दल रोहितराजे पवार यांनी माहिती दिली. 

'पवार घराणे हे राजपुत. राजस्थानातील माउंट अबू हे त्यांचं मुळ स्थान. सुरवातीला पारमार या नावाने ते ओळखले जायचे. या घराण्याचे राजे भोज, राजे विक्रमादित्य यांची कारकीर्द गाजलेली. महाराष्ट्रातील सुरगाणा संस्थानाचे ते राजे. त्यांनी कोणत्याही साम्राज्यासमोर हार मानली नाही म्हणुन त्यांना 'बंदे मुल्क' म्हटलं जायचं. सुरगाणा प्रांतांच्या भौगोलिक स्थितीमुळे शत्रुला लढाई अवघड जात असे. दोन्ही बाजुंनी डोंगर असल्याने सुरगाणा जिंकणे कठिण होते. इतकेच काय तर व्यापार किंवा इतर कारणासाठी गुजरात प्रांतात जाण्यासाठी किंवा तिकडुन येण्यासाठी सुरगाणातुनच जावे लागे. त्यावेळी इतरांना हा मार्ग वापरण्यासाठी कर द्यावा लागत असे,' अशी माहिती रोहीतराजे पवार यांनी दिली. 

Image may contain: 10 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 10 people, people smiling, people standing

Web Title: marathi news surgana provience history rohitraje pawar