ट्रक-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

गणेश बोरुडे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

तळेगाव : तळेगाव-चाकण महामार्गावर इंदोरीनजीक शिवप्रसाद ढाब्यासमोरील वळणावर आज शुक्रवारी (ता. १२) सकाळी ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. सारंग सुधीर दाणी (२५, यशवंतनगर, प्लस सोसायटी, तळेगाव स्टेशन) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंग हा दुचाकी क्रमांक एम. एच. 14 एफ. झेड. 9635 ने चाकणकडे जात असताना, चाकणकडून-तळेगावच्या दिशेला येणाऱ्या कंटेनर एम.एच. 46 ए.एफ. 6677 शी समोरासमोर धडक होऊन तो दुचाकी आणि कंटेनरच्या मध्ये अडकला.

तळेगाव : तळेगाव-चाकण महामार्गावर इंदोरीनजीक शिवप्रसाद ढाब्यासमोरील वळणावर आज शुक्रवारी (ता. १२) सकाळी ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. सारंग सुधीर दाणी (२५, यशवंतनगर, प्लस सोसायटी, तळेगाव स्टेशन) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंग हा दुचाकी क्रमांक एम. एच. 14 एफ. झेड. 9635 ने चाकणकडे जात असताना, चाकणकडून-तळेगावच्या दिशेला येणाऱ्या कंटेनर एम.एच. 46 ए.एफ. 6677 शी समोरासमोर धडक होऊन तो दुचाकी आणि कंटेनरच्या मध्ये अडकला. प्रयासाने बाजूला काढल्यानंतर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर कंटेनर जागेवरच सोडून चालक फरार झाल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक सहाय्यक अण्णासाहेब सरगर आणि सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद हिंगोले करीत आहेत.

 

Web Title: Marathi news talegao news truck and bike accident one young boy dies