भोरला '३रे शाहू, फुले, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

भोर : येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ व समविचारी संस्थांच्या वतीने घेण्यात येणा-या तिस-या 'फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनास' शनिवारी (ता. २३) सुरुवात होणार आहे. आमदार संग्राम थोपटे स्वागताध्यक्ष असलेल्या या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय खरे संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहरातील 

शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर दोन हजार व्यक्तींसाठी १५ हजार स्क्वेअरफूटांचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे.  
   
शनिवारी दुपारी दोन वाजता अविनाश महातेकर यांच्या हस्ते संविधान रॅली व ग्रंथयात्रा काढून संमेलनाची सुरवात होणार आहे. पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, सांगलीचे उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व राजकीय अभ्यासक प्रकाश पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर ग्रंथदालन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि सायंकाळी पाच वाजता रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. राज्यभरातील १५ कवी यामध्ये सहभागी होणार आहेत. रविवारी (ता.२४) सकाळी १० वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते 
संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दिग्दर्शक जब्बार पटेल, संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर  फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा आणि आमचा राजकीय पक्ष या विषयावर होणार परिसंवाद होणार आहे. यामध्ये काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या डॉ. नीलम गो-हे, भाजपाचे डॉ. सुनील गायकवाड, माकपाचे अजित अभ्यंकर, एम.आय.एम.चे इंमतियाज जलील व भारिप बहुजन महासंघाचे विकास साळवे सहभागी होणार 
आहेत. 

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे या परिसंवादाचे अध्यक्ष असून पत्रकार अशोक वानखेडे संयोजन करणार आहेत. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो राहणार आहेत. याशिवाय ग्रंथयात्रा, संविधान रॅली, ग्रंथप्रदर्शन व कविसंमेलन आदी कार्यक्रमही होणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरक पुरस्कार तर चंद्रकांत सपकाळ यांना तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. याखेरीज शंभर टक्के संविधान साक्षर झालेल्या लव्हेरी (ता.भोर) येथील ग्रामस्थांचा 
सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.

Web Title: Marathi news third shahu phule ambedkar literature festival organised in the bhor