पर्यटननगरी की "नशेचा अड्डा' 

भाऊ म्हाळसकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

लोणावळा - लोणावळा- खंडाळ्यात होणाऱ्या रंगेल पार्ट्या आणि काही भागांतील "ओपन बार'मुळे "पर्यटननगरी' बदनाम होऊ लागली आहे. त्याचा त्रास अन्य पर्यटकांसह स्थानिकांनाही होत आहे. वाढती गुन्हेगारीही चिंताजनक आहे. पर्यटननगरीचा लौकिक टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची आवश्‍यकता आहे. 

लोणावळा - लोणावळा- खंडाळ्यात होणाऱ्या रंगेल पार्ट्या आणि काही भागांतील "ओपन बार'मुळे "पर्यटननगरी' बदनाम होऊ लागली आहे. त्याचा त्रास अन्य पर्यटकांसह स्थानिकांनाही होत आहे. वाढती गुन्हेगारीही चिंताजनक आहे. पर्यटननगरीचा लौकिक टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची आवश्‍यकता आहे. 

खुलेआम मद्यपान 
लोणावळा सर्रास रंगेल पार्ट्या रंगत आहेत. सार्वजनिक ठिकाणेही त्याला अपवाद नाहीत. अनेक ठिकाणी खुलेआम मद्यविक्री केली जाते. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना हटकले तर स्थानिकांबरोबर वादाचे प्रसंग रोजचेच झाले आहेत. या घटनांना आता गंभीर रूप धारण होत आहे. सकाळी अनेक ठिकाणी बाटल्यांचा खच दिसून येतो. 

पोलिसांचा वचक हवा 
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. काही वेळी "अर्थपूर्ण' तडजोडीनंतर प्रकरण दडपण्यात येते, असे नागरिक बोलून दाखवितात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

हे आहेत "ओपन बार' 
- टाटा धरणालगत असलेला "छोटा काश्‍मीर' 
- कानिफनाथ मंदिर परिसर 
- भुशी डॅम परिसर 
- तुंगार्ली धरण परिसर 
- रेल्वे मैदान 
- व्हीपीएस विद्यालय पादचारी पूल 
- रेल्वे स्टेशन परिसर 
- कुमार रिसॉर्ट वाहनतळ 
- खंडाळ्यातील द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल 

हुल्लडबाजीच्या घटनांमुळे शहराचे वातावरण बिघडते. पोलिसांचे या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असून, यावर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे. 
श्रीधर पुजारी, उपनगराध्यक्ष 

"मॉर्निंग वॉक'ला जाताना वाटेतच बाटल्या व कचऱ्याचा ढीग दिसतो. अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र कारवाई होत नाही. 
सुभाष राशीनकर, नागरिक 

ओपन बार किंवा हुल्लडबाजी असे प्रकार सुरू असताना लगेच माहिती मिळत नाही. मात्र, गस्तीवर असे प्रकार दिसल्यावर लगेच कारवाई करण्यात आली आहे. 
- चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

Web Title: marathi news Tourism city tourist lonavala