"ट्रॅफिक एज्युकेशन पार्क' होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - वाहतूक नियम आणि त्याची परिणामकारकता शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने "ट्रॅफिक एज्युकेशन पार्क'ची उभारणी करण्यात येणार आहे. निरनिराळी वाहतूक व्यवस्था, त्यातील वाहने, ती वाहून नेणारी रस्ते, वाहतूक नियंत्रण यंत्रणा आणि वाहतूक कोंडीची कारणे याचे सादरीकरण विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांसह महापालिका, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) समिती काम करेल. मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेत हे पार्क साकारले जाणार आहे. 

शहरातील वाहन संख्येत वर्षाकाठी साधारणत: दीड ते पावणेदोन लाखांची भर पडत आहे. एवढ्या प्रमाणातील वाहनांच्या वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा नसल्याने वाहतूक कोलमडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न होत असले तरी, त्याची परिणामकारकता वाढत नसल्याची परिस्थिती रस्त्यांवर दिसत आहे. परिणामी, अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळित होऊन ती धोकादायक असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले. त्यादृष्टीने वाहनांची वर्दळ असलेले रस्ते आणि चौकांची पाहणी करण्यात आली असून, तेथील वाहतूक सुरळीत व्हवी, यासाठी उपाययोजना आखून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. परतु, वाहतूक सुधारण्यासाठी वाहनचालकांनी शिस्त पाळण्याची गरज असल्याने वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यात येणार आहे. ती विशेषत: शालेय विद्यार्थ्यांमध्ये केल्यास त्याचे परिणाम दिसून येतील. त्यामुळे या घटकाला वाहतुकीबाबत शिक्षण देण्यासाठी "ट्रॅफिक एज्युकेशन पार्क' उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात 50 लाखांची तरतूद केली आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. 

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, ""सूंपर्ण शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काही योजना आखल्या आहेत. मुळात, वाहतूक नियमांचे पालन झाल्यास बहुतांशी वाहतूक सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी पार्क उभारण्यात येईल. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाणार असून, त्यात रोज पाचशे विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात पार्कचे काम होईल.''

Web Title: marathi news traffic education park pune news rto