लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी तातडीने सोडविणार - डॉ.दिलीप माने 

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 9 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : लासुर्णे (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी तातडीने सोडविण्याचे आश्‍वासन जिल्हा आरोग्यधिकारी डॉ.दिलीप माने यांनी दिले.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासुन श्‍ावविच्छेदन करण्यासाठी कायमस्वरुपी व्यक्ती नसल्यामुळे शवविच्छेदनासाठी आलेल्या नातेवाईकांकडून अडवणूक करुन ज्यादा पैसे घेतल्याचे प्रकार घडत असल्याने श्‍ावविच्छेदनासाठी कायमस्वरुपी व्यक्तीची नियुक्ती करावी, गोळा औषधांचा तुटवडा होवू नये, आरोग्य केंद्राच्या परीसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.

तसेच वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील अपघात व आकस्मात होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त असल्याने श्‍ावविच्छेदनाचा अहवाल तातडीने देण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी जिल्हाआरोग्य अधिकाऱ्याकडे केली होती. जिल्हा आरोग्यधिकारी  डॉ.माने यांनी भेट देवून प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तातडीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.
 
Web Title: Marathi news valchandnagar news health clinic lasurne