विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

राजकुमार थोरात
शुक्रवार, 9 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

वालचंदनगर (पुणे) : कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. वसंत दगडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दगडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिला कुंटूंबाकडे लक्ष देत असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्याच्या काळामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक उंची गाठायची असेल तर आपले आरोग्यही उत्तम असणे गरजेचे असल्याने महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.तसेच पुरुषांनीही महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

महिलादिनानिमित्त शाळेतील मुलींनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व भारत मातेचा वेषभूषा करुन आल्या होत्या. यावेळी मुलींनी ‘जन्म बाईचा ग! बाईचा’ या गाण्यावर नृत्य सदर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या प्रमुख माधुरी लडकत, दिपाली बोराडे यांनी मुलींना निर्भया पथकाची माहिती दिली. कार्यक्रमास  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.अंकुश आहेर, उपप्राचार्य डॉ.बबन भापकर,दयानंद मिसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कांबळे,  सुत्रसंचालन डॉ.तेजश्री हुंबे  व जे.जी.गायकवाड यांनी केले व  आभार मयुरी पाटील यांनी मानले. 
 

Web Title: Marathi news valchandnagar news womens day