पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी        

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - संगीताला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संगीताचा संपूर्ण भारतभर प्रचार आणि प्रसार करणारे प्रसिद्ध गायक पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. 

आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासमवेत अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर भांडारे, डॉ. विकास कशाळकर, उपाध्यक्ष माधव वसेकर आणि सचिव पांडुरंग मुखडे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर केले. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांना 'भारतरत्न' देण्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Marathi News Vishnu Pluskar Bharat Ratna Demand