व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कूलची विभागीय पातळीवर निवड

राजकुमार थोरात
गुरुवार, 4 जानेवारी 2018

वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांची शरद मल्हार स्पर्धेत विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 शरद मल्हार महोत्सवातील जिल्हास्तरीय स्पर्धा नुकत्याच पुणे येथे पार पडल्या. स्पर्धेमध्ये जिल्हातून १६ संघ सहभागी झाले होते.

 व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘त्रिपुरा लोकनृत्य’ सादर करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चौथा क्रंमाक पटकावला आहे. शाळेतील २२ विद्यार्थीनींनी लोकनृत्यामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या संयोजिका वैशाली नागवडे व दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

 स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य संदीप पानसरे, अमोल कोकरे, प्रियंका मोरे, नितीन सोरटे, किरण रणवरे, सचिन बंडगर, कलावंत भिसे यांनी मार्गदर्शन केले. विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Marathi news vyankateshwara english medium school selected for next level