वडगाव निंबाळकरमध्ये वसंत पंचमीनिमित्त रथयात्रा

चिंतामणी क्षीरसागर
सोमवार, 22 जानेवारी 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील जैन समाजाच्या वतिने सोमवार (ता. २२) वसंत पंचमी निमित्त परंपरेनुसार निघालेली रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

वडगाव निंबाळकर (पुणे) : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील जैन समाजाच्या वतिने सोमवार (ता. २२) वसंत पंचमी निमित्त परंपरेनुसार निघालेली रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

येथील 108 अतिशय क्षेत्र समजल्या जाणाऱ्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीरात भजन, पुजन, अभिषेक असे धार्मीक कार्यक्रम प्रथेनुसार पार पडले. सकाळी भगवान महावीरांच्या मुर्तीची पालखीतून सवाद्य मिरवणूक झाली. दुपारी रथामधे पार्श्वनाथांसह महावीरांची मुर्ती व शास्त्र ठेउन नगरप्रदक्षणा करण्यात आली. यावेळी परिसरातील गावातील जैन बांधव सहभागी झाले होते. पुरातन काळापासुन चालत आलेल्या या रथयात्रेची मोठी धार्मीक पंरपरा आहे. यामधे सहभागी होउन पुजापाठ व सेवा करण्यासाठी जैन बांधव एकत्र येतात. 

Web Title: Marathi news wadgao nimbalkar

टॅग्स