आता वाघोली ओलांडा पाच मिनिटांत

योगिराज प्रभुणे
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे - नगरला जाताना वाघोलीचा परिसर ओलांडण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तासाऐवजी अवघी पाच मिनिटे लागतील, असे जर कोणी सांगितले, तर तुमचा विश्‍वास बसेल का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. ते शक्‍य होईल कारण ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’(पीएमआरडीए) आता वाघोलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. वाघोली म्हणजे वाहतूक कोंडी असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून नगर रस्त्यावर दिसत आहे. कामानिमित्त या मार्गाने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र या वाहतूक कोंडीचा फटका रोजच्या रोज बसतो.

सहा महिन्यांनंतर पहिला दिलासा 
वाघोली येथील वाहतूक कोंडी फोडून पूर्व पुण्याला पहिला दिलासा देण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रुंदीकरण हा सर्वांत जवळचा पर्याय असल्याचे ‘पीएमआरडीए’ने निश्‍चित केले आहे. या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जागा हस्तांतरण आणि ना हरकत प्रमाणपत्र द्यावे असे पत्र पाठविले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबरपर्यंत याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी आठ कोटी रुपये खर्च येणार आहे. 

बाह्यवळण मार्ग 
भारतीय जैन संघ महाविद्यालय ते बावडी परिसरातील भैरवनाथ मंदिर या दरम्यान बाह्यवळण रस्ता नियोजित केला आहे. त्याची निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. यात काही जागा ‘पीएमआरडीए’ला मिळाली आहे. तर, काही जागा अद्यापही ताब्यात आलेली नाही. यासाठी नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

ग्रेड सेपरेटर 
आव्हाळवाडी येथे ग्रेड सेपरेटर करण्याचाही एक पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे महामार्गाने जाणाऱ्या वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. सुमारे दीड किलोमीटरचा हा ग्रेड सेपरेटर असेल. त्यामुळे आव्हाळवाडी, केसनंद आणि वाघोली या दरम्यानची वाहतूक सुरळीत होईल. या दरम्यान सध्या प्रवासासाठी एक ते दीड तास लागतो. तो वेळ आता पाच मिनिटांपर्यंत कमी होईल. 

वाघोली भागात वेगाने शहरीकरण होत आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा त्या तुलनेत उपलब्ध नाहीत. वाहतूक कोंडी हा त्यातील एक भाग आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. त्या आधारावर निर्णय घेण्यात येत आहेत. 
- किरण गित्ते,  आयुक्त, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण 

Web Title: marathi news Wagholi traffic pune