वालचंदनगरमध्ये भाभा अॅटाेमिक रिसर्च सेंटरच्या वतीने अणूउर्जाविषयी प्रदर्शन

राजकुमार थोरात
बुधवार, 20 डिसेंबर 2017

वालचंदनगर : येथे भाभा परमाणू (अणू) संशोधन केंद्र व वालचंदनगर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अणूउर्जा’विषयी माहिती सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वालचंदनगर परिसरातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून माहिती घेतली.

वालचंदनगर : येथे भाभा परमाणू (अणू) संशोधन केंद्र व वालचंदनगर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अणूउर्जा’विषयी माहिती सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वालचंदनगर परिसरातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून माहिती घेतली.

ग्रामीण भागातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांना अणूउर्जाविषयी कमी प्रमाणात माहिती असल्याने अणूउर्जाविषयी अनेक समज- गैरसमज आहेत. भाभा परमाणू संशोधन केंद्राच्या वतीने संपूर्ण देशभर अणूउर्जाविषयी जनजागृती केली जात आहे. येथे वालचंदनगर कंपनीच्या वतीने गणेश हाॅलमध्ये एकदिवसीय अणूउर्जा प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्धाटन वालचंदनगर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर वाल्मिक शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाभा परमाणू संशोधन केंद्राचे मिडिया रिलेशन व जनजागृती विभागाचे अध्यक्ष आर.के.सिंग, वालचंदनगर कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक आनंद नगरकर, शाळा समितीचे अध्यक्ष धीरज केसकर, भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमीचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, वर्धमान विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ जाधव उपस्थित होते.

आर.के.सिंग यांनी सांगितले, की अणूऊर्जाचा उपयोग हा आज दैनंदिन जीवनामध्ये होत आहे. कृषि क्षेत्रामध्ये कमी वेळेमध्ये जास्त दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी दर्जेदार बियाणे तयार करणे, उत्पादित केलेला माल जास्त काळ टिकवणे, कीड नियंत्रित करणे, तसेच विविध गंभीर आजारांचे निदान करुन उपचार करणे, वीजनिर्मिती करण्यासाठी होत आहे. अनेक नागरिकांना अणूउर्जाविषयी माहिती नसल्याने अशी अणूऊर्जाची प्रदर्शने व मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

वालचंदनगरमधील भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी,वर्धमान विद्यालय,जंक्शन मधील नंदिकेश्‍वर विद्यालयातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी अणूउर्जाच्या प्रदर्शनाचा लाभ घेऊन माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश सराफ यांनी केले. 

Web Title: marathi news walchandnagar bhabha automic research center exibition