धरणे आंदोलनानंतर वनविभागाने केली त्वरित कामाला सुरवात

राजकुमार थोरात
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील वनविभागाच्या हद्दीतील अपुऱ्या व निकृष्ठ माती नाला बंधाऱ्यामध्ये युवकांनी उपोषण करताच वनविभागाने अपुरे कामाला तातडीने सुरवात केली.

वालचंदनगर (पुणे) : बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील वनविभागाच्या हद्दीतील अपुऱ्या व निकृष्ठ माती नाला बंधाऱ्यामध्ये युवकांनी उपोषण करताच वनविभागाने अपुरे कामाला तातडीने सुरवात केली.

बिरंगुडी येथे वनविभागच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये माता नाला बंधाऱ्याचे निकृष्ठ दर्जाचे व अपूर्ण अवस्थेमध्ये होते. अपूर्ण कामामुळे चालू वर्षी झालेला ६०० मिलीमिटर पावसाचे पाणी वाहून गेले. या कामासह तालुक्यातील वनविभागच्या हद्दीतील निकृष्ठ कामाची चौकशी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुक्याचे उपाध्यक्ष शेखर काटे  व दादा भरणे यांनी माती नाला बंधाऱ्याच्या तळ्यामध्ये सोमवारी (ता. ५) एकदिवसाचे धरणे आंदोलन केले.

आंदोलनाची बातमी प्रसिद्ध होताच वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने निकृष्ठ व अपुऱ्या कामाला आजपासून सुरवात केली आहे. यासंदर्भात काटे यांनी सांगितले की,तालुक्यामध्ये वनविभागच्या हद्दीमध्ये जलसंधारणाची कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. निकृष्ठ कामामुळे तालुक्यामध्ये ६०० मि.ली मिटर पाउस पडून ही थेंबभर ही पाणी साचले नसल्याने शासनाचा कोट्यावधी रुपये निधी वाया गेला असून वनविभागाच्या हद्दीतील सर्व जलसंधारण कामाची चौकशी करण्याची मागणी वनमंत्रयाकडे केली असल्याचे सांगितले.
 

Web Title: Marathi news walchandnagar news agitation dam