झेडपीच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती माने यांची अपघातग्रस्ताला मदत

राजकुमार थोरात
गुरुवार, 25 जानेवारी 2018

वालचंदनगर : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी पुणे सोलापूर महामार्गावर बिजवडी (ता. इंदापूर) येथे  दुचाकीवरुन चक्कर येऊन पडलेल्या भगवान चव्हाण यांना तात्काळ मदत करुन उपचारासाठी स्वत:च्या चारचाकी गाडीमधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले.

दौंड तालुक्यातील मळद येथील भगवान देवराव चव्हाण (वय 55) हे बुधवारी (ता. 24) दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास इंदापूरहून पुणे सोलापूर महामार्गाने दुचाकीवरुन मळदकडे चालले होते. बिजवडी येथे दुचाकी आल्यानंतर चव्हाण अचानक गाडीवरुन पडले. याच वेळी झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने इंदापूरहून पुणे सोलापूर महामार्गाने वरकुटे येथे चालले होते. झालेला अपघात पाहताच माने यांनी स्वत:च्या गाडीमधून तात्काळ बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. यापूर्वीही माने यांनी अनेक रुग्णांना उपचारासाठी रसत्यामध्ये मदत केल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे अपघात झाल्याचे पाहून नागरिक मदत न करताच निघून जात असल्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात माने यांनी सांगितले की, अपघातानंतर गोल्डन अवर (एक तासामध्ये) रुग्णाला मदत मिळणे गरजेचे असते. प्रत्येक नागरिकांनी अपघातील नागरिकांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

Web Title: Marathi news walchandnagar news helps in accident