अनाथ अाश्रमातील मुली व मुलांना शिंगाडे कुंटूबाचा मदतीचा हात

राजकुमार थोरात
शुक्रवार, 9 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हटले की, भजन, किर्तन व फुले अर्पण करण्याचा सोहळ्याचा कार्यक्रम डोळ्यासमोर येतो. मात्र शेळगाव (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अाबासाहेब शिंगाडे यांनी वडिलांच्या प्रथमपुण्यतिथी निमित्त भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन अनाथआश्रमातील मुलींना कपड्यांची व मुलासांठी आर्थीक मदतीचा हात देवून पुण्यतिथी कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा संदेश दिला. 

शेळगाव येथील स्वर्गीय विठ्ठलराव कृष्णाजी शिंगाडे यांची आज प्रथम पुण्यतिथीनिमित्त भजन, किर्तनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय विठ्ठलराव शिंगाडे यांचा मुलगा आबासाहेब शिंगाडे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड दिली.

इंदापूर येथील श्रावणबाळ अनाथ अाश्रमातील मुलांनी नवीन कपडे देण्याचा व माऊली बालक आश्रमातातील मुलांना पाच हजार देण्याचा उपक्रम राबवून समाजातील नागरिकांना सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याचा संदेश दिला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व कर्मयोगी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्‍ते कपडे व धनादेश देण्यात आला. यावेळी पाटील यांनी सांगितले की, शिंगाडे कुंटूंबाने पुण्यतिथी निमित्त अनाथआश्रमातील मुली व मुलींना केलेली लाखमोलाची मदत महत्वाची आहे. समाजातील इतर नागरिकांनी शिंगाडे कुंटूबाचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ,कर्मयाेगाीचे संचालक वसंत मोहोळकर,सुभाष काळे,अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील,मोहन दुधाळ,  विठ्ठल जाधव, सरपंच उज्ज्वला शिंगाडे , श्रावणबाळ आश्रमाचे राजीव करडे ,माऊली बालक आश्रमाच्या सुशीला शेटकर उपस्थित होत्या. यावेळी हभप सोपान महाराज सानप शास्त्री यांचे किर्तन झाले. 
 
Web Title: Marathi news walchandnagar news orphanage childs help by shingade family