वालचंदनगरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राजकुमार थोरात
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पुस्तके वाचण्याचा व स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला.

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पुस्तके वाचण्याचा व स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला.

वालचंदनगर येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी, तनाझ दोशी , अनिला पिल्लई, कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख आनंद नगरकर उपस्थित होते. यावेळी पिल्लई यांनी सांगितले, की वालचंदनगर कंपनीचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशउभारणीच्या कामामध्ये मोलाचे योगदान आहे. आजही कंपनी देशाच्या प्रगतीसाठी अवकाश संशोधन, मिसाईल, संरक्षण क्षेत्रामध्ये जोमाने काम करीत असल्याचे सांगितले.

यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भारत चिल्ड्रन्स अकादमी, वर्धमान विद्यालय व पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून पुस्तके वाचाल तरच वाचाल. 'स्वच्छ भारत अभियान'चा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या परेडमुळे उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. कंपनीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: Marathi News Walchandnagar News Pune Republic day Celebration