नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेडनेटचा वापर

राजकुमार थोरात 
बुधवार, 24 जानेवारी 2018

वालचंदनगर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सतिश बाबा शिंदे या शेतकऱ्याने एक एकर द्राक्ष बाग शेडनेटने झाकली असून यामुळे द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन मिळू लागले आहे. निर्सगाचा लहरीपणा सर्वाधिक फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. 

गारपीट, अवकाळी पाऊस, धुके, अचानक कडक पडणारे ऊन यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी बोरी येथील सतिश बाबा शिंदे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये वरच्या बाजुने शेडनेट प्रायोगिक तत्त्वावर वापर केला आहे. यामुळे शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीपासून होणारा धोका कमी झाला असून होणारे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. शेडनेटमुळे उन्हामुळे होणाऱ्या सनबर्निंगचा धोका कमी झाला आहेत. तसेच अचानक होणारा अवकाळी पावसाचाही फटका बसणार नसून थंडीमध्ये तयार होणाऱ्या गारव्यामुळे होणारे नुकसान ही टळणार आहे.

यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, शेडनेटमुळे चालू वर्षी चांगल्या प्रतिची द्राक्षांचे उत्पादन घेण्यास मोलाची मदत झाली असून वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान टळले आहे. एक एकर शेडनेट करण्यासाठी सुरवातीपासुन बागेमध्ये बदल करावेत लागत असून इतर बागांच्या तुलनेमध्ये एकर चार लाख रुपये खर्च ज्यादा येत आहे. शासनाने शेडनेट साठी अनुदान देण्याची गरज असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील प्रगतशिल शेतकरी सदाशिव शेळके यांनी नुकतीच शिंदे यांच्या बागेला भेट दिली. यावेळी शेळके यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेती व्यवसायक करावा. यावेळी कळसचे सरपंच गणेश सांगळे, संतोष भरणे, पंकज शिंदे, सचिन सांगळे उपस्थित होते.

Web Title: Marathi news walchandnagar news shade net