विद्यार्थ्यांची तंबाखूमुक्त परीसर करण्यासाठी जनजागृती मोहिम

राजकुमार थोरात
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयाच्या शाळेचा परीसर व गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

4 फेब्रुवारी  हा जागतिक कर्करोग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. समाजातील अनेक नागरिक तंबाखु खात असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या मध्ये कर्करोगाची जनजागृती होण्यासाठी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी शाळेतील सर्व शिक्षक,ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनीं शाळेमध्ये तंबाखूमुक्त शाळा व परिसर करण्याची शपथ घेतली.

कर्करोग दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये तंबाखू विरोधी पोस्टर्स स्पर्धा, निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या परीसरामध्ये तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परीणामाची  माहिती सांगणारी जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये मुख्याध्यापक गणेश घोरपडे, संतोष कदम, अभिमन्यू चव्हाण, सुनील कणसे बाळासाहेब मोरे, अंबादास कांबळे, सुनील कांबळे, सुशांत देवकर, स्वाती शिंदे, शोभा पोळ, मेहमूद मुलाणी, शिवाजी मोरे, बापूराव कदम यांनी सहभाग घेतला.  
 
Web Title: Marathi news walchandnagar news tobacco free oath