थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करू

ज्ञानेश्‍वर बिजले 
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे, ता. ९ ः जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेकडे ३५४ कोटी रुपयांची थकबाकी असून, पाणीपट्टीची ही रक्‍कम २० मार्चपर्यंत न भरल्यास महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इaशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी त्याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. महापालिकेकडे २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षातील जानेवारीपर्यंतची थकबाकी ४० कोटी ८२ लाख रुपये आहे. ८९ टक्के घरगुती आणि ११ टक्के औद्योगिक वापर फरकाची देयके 

यासंदर्भातील २०१२-१३ ते २०१६-१७ या वर्षांतील रक्कम ३५४ कोटी ७३ लाख रुपये आहे.

याला पालिकाच जबाबदार राहील
‘‘प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाचे काम नोव्हेंबर २०१६ पासून संबंधित महामंडळाकडे आहे. सिंचन व बिगरसिंचन पाणीपट्टी वसूल करून त्या रकमेतून सिंचन प्रकल्पांचा देखभाल, दुरुस्ती आणि  आस्थापना खर्च भागविण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रणालीतील वरसगाव, पानशेत व खडकवासला या धरणांची देखभाल दुरुस्ती

पुणे महापालिकेच्या पाणीपट्टी 
वसुलीतूनच करावी लागणार आहे. आस्थापना व अन्य खर्चही भागवायचा आहे. पुण्यातील नागरिकांनी पाणीपट्टी देयके महापालिकेस दिली आहेत. त्या जमा रकमेतून महापालिकेने जलसंपदा विभागाची थकीत रक्कम द्यावी. ती न दिल्यास २० मार्चनंतर नाइलाजाने पुण्याचा पाणीपुरवठा खंडित करावा लागेल. त्याची जबाबदारी महापालिकेवर राहील,’’ असे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे. 

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख कुलकर्णी म्हणाले
 जलसंपदा विभागाची आकडेवारी चुकीची
 बिलाच्या आकडेवारीची सविस्तर माहिती मागू
 येत्या सोमवारी सिंचन भवनात जाऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू

Web Title: marathi news water PMC pune