महिलांसाठी लवकरच मुक्ता व्यासपीठ - गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे-  ‘‘न्याय व्यवस्थेने काही कायद्याबाबत स्वतःहून पुढाकार घेत महिलांच्या बाजूने सकारात्मक पाऊल टाकले आहे. याचा अर्थ न्यायव्यवस्था बदलत आहे. महिलांसाठी लवकरच मुक्ता व्यासपीठ स्थापन केले जाईल,’’ अशी माहिती स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख आमदार नीलम गोऱ्हे यांनी दिली.  

राज्य महिला आयोग व स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या महिला कायदेविषयक कार्यशाळेत त्या बोलत होत्या. आयोगाच्या सदस्य विंदा कीर्तिकर, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सुप्रिया बडवे, दुर्गा तांबे, संगीता मालकर, अनिता जगताप, स्वाती बोरावके, शीतल वारुळे आदी उपस्थित होते. दहा वर्षांत बलात्काराचे प्रमाण दुप्पट झाले आहे. बलात्काराच्या घटनेत राज्य देशात तिसऱ्या स्थानावर आहे. महिलाविषयक कायदे कडक असतानादेखील या गुन्ह्यामध्ये घट होत नसल्याची चिंता निवृत्त पोलिस उपायुक्त खुशालचंद बाहेती यांनी व्यक्त केली.

Web Title: marathi news women neelam gorhe pune