marathi
marathi

#मायमराठी : मराठ्यानों, दाक्षिणात्यांकडून भाषाप्रेम शिका :  प्रा.हरी नरके

पुणे : ''ज्या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यांच्याप्रमाणेच मराठीने त्याबाबतचे सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्षे उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषातज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे. असे मत अभिजात मराठी भाषा (पठारे समिती) समितीचे समन्वयक प्रा.हरी नरके यांनी व्यक्त केले. 

"केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आज (ता. ६) १५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. यानिमित्ताने 'सकाळ'शी त्यांनी बातचित केली .'सकाळ'ने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे  असेही ते यावेळी म्हणाले.  

ते म्हणाले,  ''आता लवकरच राज्य विधानसभेच्या निवडणूका येत आहेत. त्याआधी राज्य सरकारने केंद्राकडे या दर्जासाठी आग्रही पाठपुरावा करायला हवा. पठारे समितीने आपल्या अहवालात सर्व पुरावे दिले, कागदपत्रे सादर केली. यापुढचे राजकीय दबाव निर्माण करण्याचे काम राज्यसरकार व नागरिकांचे आहे. तमीळ व इतर दक्षिणी भाषांकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवे.''

,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com