पुणेकरांसाठी मराठी रॉक कॉन्सर्ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे - उत्तमोत्तम नाट्यप्रयोग, लाइव्ह कॉन्सर्ट अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे ‘सकाळ’ने नेहमीच कलाप्रेमी पुणेकरांची मने जिंकली आहेत. मराठी संगीत प्रेमींसाठी ‘सकाळ माध्यम समूह’ एक आगळावेगळा प्रयोग ‘मराठी रॉक बॅंड’ घेऊन येत आहे. ही मराठी रॉक कॉन्सर्ट शनिवारी (ता. २०) कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म येथे होणार आहे.

सर्जनशीलदृष्टीने मराठी संगीत सादर करणारे ‘मोक्ष’ या जगातल्या पहिल्या मराठी रॉक बॅंडचे कलाकार ही कॉन्सर्ट सादर करणार आहेत. रॉक शैलीमध्ये भजन सादरीकरणाच्या त्यांच्या प्रयोगाबरोबरच रसिकांच्या पसंतीस उतरलेला त्यांचा आणखी एक वेगळा प्रयोग रॉक शैलीत सादर केलेले ‘लाभले आम्हास भाग्य...’ हे मराठी अभिमान गीत आहे. शास्त्रीय नृत्यासोबत तांडव या गाण्याचे मोक्षच्या कलाकारांकडून होणारे सादरीकरणही आवर्जून पाहण्यासारखे आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक आहे. यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असला तरी कार्यक्रमाच्या प्रवेशिका घ्याव्या लागणार आहेत. सोमवारपासून (ता. १५) प्रवेशिका उपलब्ध असतील.

मोफत प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
 सकाळ, बुधवारपेठ कार्यालय - (स. ११ ते सायं. ६) 
 पंडित फार्म, कर्वेनगर - 
(स. ११ ते सायं. ६) 
 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पौड रस्ता, डहाणूकर कॉलनी, नवी पेठ, औंध आणि सेनापती बापट रस्ता शाखा - (स. ११ ते सायं. ५)

Web Title: Marathi rock concert for pune citizen