मराठी साहित्य जपानीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सिंहगड रस्ता - मराठी साहित्यिकांचे साहित्य जपानी भाषेत अनुवादित करून त्याच्या अभिवाचनातून अनोख्या सादरीकरणाचा अनुभव पुणेकरांनी पु. ल. देशपांडे उद्यानात घेतला. 

असोसिएशन ऑफ फ्रेंड्‌स ऑफ जपान, पुणे या संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे उद्यानात ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पु लं.सह अन्य काही साहित्यिकांच्या पुस्तकांतील लेख, व कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पु. ल. तसेच व्यंकटेश माडगूळकर यांच्या काही साहित्यकृती अभिवाचनाद्वारे जपानी भाषेत सादर करत ‘मासाहारू तोयोहारा’ या जपानी विद्यार्थ्याने रसिकांची मने जिंकली.

सलील वैद्य यांनी दुसऱ्या महायुद्धातील तीन हत्तीच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या सत्यकथेने नागरिकांची मने हेलावली. बकुल वैद्य, सिद्धी जोशी, आणि मुग्धा भालेराव यांनी जपानी कथा सादर केली. चेतना गोसावी, श्रीमती स्वाती भागवत, अद्वैता उमराणीकर, मीना हूननूरकर, जयश्री भोपटकर, स्वराली बापट आदींनी या वेळी जपानी लोककथा, कविता, ‘हायकू’चे वाचन करत उपस्थितांची दाद मिळविली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. समीर खळे, मुंबईतील जपानी वकिलातीमधील कौन्सिल युकिओ अचिदा, माजी कौन्सिल हिरोबुगी नाकाजिमा, पुण्यात जपानी भाषेचा शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मिचिको तेंडुलकर, वाकायम प्रांताचे महाराष्ट्रातील प्रतिनिधी तात्सुनोरी ओनिशी, संस्थेच्या समन्वयक स्वाती भागवत, सचिव आमोद देव, जयश्री भोपटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi Sahitya in Japan