फक्त दहा सेकंदात होणार कोरोनाचं निदान; मराठमोळ्या शास्त्रज्ञानं विकसित केलं यंत्र!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

व्यक्तीच्या रक्तातील कोरोना प्रतिपिंडांच्या शोधावर निदान करणारी ही पद्धतीची अचूकताही जास्त आहे.

पुणे : कोरोनाच्या निदानासाठी आता तासन्‌तास थांबण्याची गरज नाही. केवळ दहा सेकंदात कोरोनाचे निदान करणारी प्रतिपिंडे (अँटीबॉडी) चाचणी यंत्र विकसित करण्यात अमेरिकास्थित मराठमोळ्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. पेन्सिल्वेनीया प्रांतातील कार्नेजी मेलॉन विद्यापीठाचे डॉ. राहुल पानट यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या चमूने हे संयंत्र विकसित केले आहे. 

कोरोनासाठी प्रथमच त्रिमितीय छपाई (थ्रीडी प्रिंटिंग) अभियांत्रिकी आणि इलेक्‍ट्रोकेमिकल या शाखा एकत्र आल्या आहेत. व्यक्तीच्या रक्तातील कोरोना प्रतिपिंडांच्या शोधावर निदान करणारी ही पद्धतीची अचूकताही जास्त आहे. मोबाईलच्या आकाराच्या या संयंत्रामुळे कोरोना निदानामध्ये मोठी क्रांती होणार आहे. 

अबुधाबीतील कंपनीच्या प्रस्तावाला डीएसकेंचा हिरवा कंदील; सुचवले तीन पर्याय​

असे आहे संयंत्र :
- त्रिमितीय छपाई तंत्रज्ञानाद्वारे (थ्रीडी प्रिंटिंग) 10 मायक्रोमिटर जाडीचे संयंत्राची निर्मिती 
- सोन्याचे अतिसूक्ष्म इलेक्‍ट्रोडचा (मायक्रोपिलर्स) वापर 
- नेनॉपार्टीकलच्या साहाय्याने इलेक्‍ट्रोडचा भाग खडबडीत करण्यात आला.
- पर्यायाने मायक्रोपिलर्सला इलेक्‍ट्रोकेमिकल अभिक्रियेसाठी जास्त जागा मिळते. 
- इलेक्‍ट्रोडवर कोरोनाच्या प्रतिजनांचा (अँटीजन) लेप लावलेला असतो.

Image may contain: phone

पुणे जिल्हा परिषद बनली राजकारणाचा अड्डा; खेड पंचायत समितीवरुन सेना-राष्ट्रवादीत जुंपली​

कसे होते निदान : 
- कोरोनाविरुद्ध कार्य करणाऱ्या प्रतिपिंडांचा (अँटीबॉडी) शोध घेण्यासाठी रक्ताचा थेंब इलेक्‍ट्रोडवर टाकण्यात येतो.
- इलेक्‍ट्रोडवरील प्रतिजनांशी(अँटीजन) अभिक्रिया झाल्यावर विशिष्ट प्रकारचे इलेक्‍ट्रॉनिक सिग्नल मिळतात. 
- संबंधित सिग्नल मोबाईलवरही पाहता येतात. 
- ज्या अर्थी प्रतिपिंडे रक्तात आहे, त्या अर्थी व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. 

संयंत्राची वैशिष्ट्ये :
- सर्वांत जलद गतीने निदान करणारे रुपयाच्या नाण्याएवढे संयंत्र 
- कोरोनासह भविष्यात इतर संसर्गजन्य आजारांचीही प्रतिपींडे निदान शक्‍य 
- स्वस्त, जलद आणि सोईस्कर निदान शक्‍य 
- निदानाची अचूकता जास्त

अरे वा...! बारामतीत रुजतेयं विषमुक्त अन्नाची चळवळ

सीओईपीचे माजी विद्यार्थी डॉ. पानट : 
पुण्याचे असलेले डॉ. राहुल पानट यांचे शिक्षण गरवारे प्रशाला, मॉडर्न कॉलेजमध्ये झाले आहे. तर त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) झाले आहे. प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. पी.व्ही.पानट यांचे ते चिरंजीव आहेत. 

त्रिमितीय छपाई तंत्रज्ञान आधारित सेन्सरवर आम्ही अनेक वर्षांपासून काम करत आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेले सेन्सर कोरोनाच्या जलद आणि स्वस्त निदानासाठी उपयोगात येणार आहे. खऱ्या अर्थाने आमच्या तंत्रज्ञानाचा सामान्यांना फायदा होणार आहे. 
- डॉ. राहुल पानट, सहयोगी प्राध्यापक, कार्नेजी मेलॉन विद्यापीठ. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi scientist has developing test device that can diagnose corona in just ten seconds