#माझी मराठी पुणेकरांची मराठीत स्वाक्षरी

#माझी मराठी पुणेकरांची मराठीत स्वाक्षरी

पुणे - आपल्यापैकी किती जण मराठीमध्ये स्वाक्षरी करतात. अनेकांना हा प्रश्‍न कदाचित पडलाही नसेल. परंतु तसे निमित्त आणि संधी उपलब्ध झाल्यावर अनेक जण हा विचार करतीलही. याच पार्श्‍वभूमीवर टिळक रस्त्यावर पुणेकरांना आपली स्वाक्षरी मराठीमध्ये बदलण्याची संधी मिळाली. मराठी भाषा दिनानिमित्त अनेक नागरिकांनी आपली स्वाक्षरी मराठीत केली.

मराठी नागरिकांपैकी ९५ टक्के नागरिक आपली स्वाक्षरी इंग्रजीमधून करतात. स्वाक्षरी ही आपली ओळख असते आणि आपली ओळख मातृभाषेतून व्हायला हवी. 

कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे स्वाक्षरी मराठीमध्ये करायचे. त्यामुळे सामान्य माणसाने आपली स्वाक्षरी मराठीत करायला सुरवात केली, तर मराठीची आणखी भरभराट होईल. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेली १० वर्षे हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राबविला जात आहे. या वेळी मनसेचे रवी सहाणे, आरती सहाणे, गणेश सातपुते, संतोष पाटील उपस्थित होते.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com