मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Anniversary
Anniversary

जुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचा ६ वा वर्धापनदिन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार लक्ष्मणजगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  

यावेळी  सामाजिक जाणीवेतून वृक्षसंवर्धनासाठी पिंपरी-चिंचवडमधील झाडांना वॉटर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच कासारवाडी येथील श्री साईदत्त मंदिर गोशाळा येथील गायींसाठी एक ट्रक चारा देण्यात आला. पिंपळेगुरवमधील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघास झाडे आणि झाडांना पाणी घालण्यासाठी झार्‍यांचे वाटप करण्यात आले. याचबरोबरच पिंपरी-चिंचवड प्लास्टिक कचरामुक्त व्हावे, यासाठी  कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, हभप शिवानंद महाराज, शिवकीर्तनकार डॉ. गजानन वाव्हळ, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक उमरगेकर, विजुअण्णा जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेविका माई ढोरे, सीमा चौगुले, नगरसेवक सागर अंगोळकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, माधव मनोरे, श्रीकृष्ण फिरके, कृष्णाजी खडसे, सुनील शिंदे, पोपट चव्हाण, डॉ. संजय पालीकुंडवार, शाम देशपांडे, गोपी शिनगारे, किसनराव फासके, मधुकर चौधरी, जालिंदर दाते, श्रीधर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शारदाताई मुंडे यांच्या हस्ते  अरुण पवार यांना अविरत सेवा कार्याबद्दल सम्राट अशोकस्तंभ सन्मानचिन्ह भेट देऊन सन्मानित करण्यात आले.  

प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी,प्रा. डॉ. गजानन वाव्हळ, शिवानंदजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत कुरुलकर यांनी, तर आभार वामन भरगंडे मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com