महाविदयालये ही व्यक्तीमत्व विकासाच्या कार्यशाळा - निळकंठ राठोड 

bhigwan
bhigwan

भिगवण : स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर तरुणांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच नोकरी व व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. महाविदयालये ही खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्व विकासाच्या कार्यशाळा आहेत. विदयापीठ व महाविदयलयाच्या माध्यमातून आयोजित व्यक्तीमत्व विकासाचे उपक्रम विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे मत येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निळकंठ राठोड यांनी केले.

येथील कला महाविदयालय व सावित्रीबाई फुले पुणे विदयापिठ यांचे संयुक्त विदयमाने आयोजित दहा दिवसीय व्यक्तीमत्व विकास कायर्शाळेच्या उदघाटन प्रंसगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य भास्कर गटकुळ होते. इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, सहाय्यक फौजदार रतीलाल चौधर, कार्यक्रम सन्वयक डॉ. प्रशांत चवरे व्यासपिठावर उपस्थित होते. निळकंठ राठोड पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये भरपुर गुणवत्ता आहे. विदयार्थ्यांनी क्रिडा, वाचन, भाषण, संवाद व लेखन आदी कौशल्ये आत्मसात करावीत.

कायर्क्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भास्कर गटकुळ म्हणाले, एकविसाव्या शतकामध्ये सवर्च क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. विविध क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी  विदयार्थ्यांनी जाणीवपूर्वक व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा विकसित विकसित व्यक्तीमत्वाचे विदयार्थी घडविण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतील. सहाय्यक फौजदार रतीलाल चौधऱ यांनी कायद्याच्या क्षेत्रामध्ये असलेल्या संधी व तंटामुक्ती व युवक या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. प्रशांत चवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार प्रदशर्न प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी केले.

दहा दिवसाच्या व्यक्तीमत्वविकास कायर्शाळेमध्ये प्रा. भास्कर गटकुळ यांचे जीवन कौशल्य, अॅड. श्रीकांत गुंड कायद्याच्या क्षेत्रातील नौकरी व व्यवसायाच्या संधी, डॉ. प्रशांत चवरे यांचे सर्जनशीलता व संवाद कौशल्य, प्रा. शाम सातर्ले यांचे ताण व्यवस्थापन व वेळ व्यवस्थापन प्रा. सुरेंद्र शिरसट यांचे मुलाखत कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, प्रा. फिरोझ शेख यांचे स्वत्वाची जाणीव, धनंजय भाट यांचे सकारात्मक दृष्टीकोन यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com