पिंपरीत मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

संदीप घिसे 
रविवार, 20 जानेवारी 2019

पती अविनाश ज्योतीराम खामकर, सासरे जोतीराम खामकर, सासू पुष्पा खामकर, दीर पंकज खामकर, जाऊ तेजस्विनी खामकर, दीर मकरंद खामकर जाऊ पूजा खामकर (सर्व रा. आशीर्वाद कॉलनी, जयमल्हार गिरणीजवळ, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरकडील आरोपींची नावे आहेत.

पिंपरी, (पुणे) : मुलगी झाली म्हणून तसेच माहेरवरून पाच लाख रुपये आणावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना रहाटणी येथे घडली.

पती अविनाश ज्योतीराम खामकर, सासरे जोतीराम खामकर, सासू पुष्पा खामकर, दीर पंकज खामकर, जाऊ तेजस्विनी खामकर, दीर मकरंद खामकर जाऊ पूजा खामकर (सर्व रा. आशीर्वाद कॉलनी, जयमल्हार गिरणीजवळ, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरकडील आरोपींची नावे आहेत. याबाबत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ६ जून २०१५ ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला मुलगी झाली तसेच घरात एसी बसविण्यासाठी आणि फ्रिज घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिला शिवीगाळ करून मारहाणही केली. तसेच मानसिक त्रासही दिला. महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Marital harassment due to girl child in Pimpri

टॅग्स