बाजार समित्यांच्या निवडणुकीत 'राष्ट्रवादी'चा दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - माजी सहकारमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य पक्षांच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या राजकारणाला धक्का देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सोमवारी बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्‍यांच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. चुरशीच्या निवडणुकांत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपसह, रासप आणि कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. तिन्ही तालुक्‍यांत मिळून "राष्ट्रवादी'ने 57 पैकी 51 जागा जिंकल्या, तर इंदापुरात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी कॉंग्रेसला मोठे आव्हान दिले होते. त्यात भरणे यशस्वी ठरले. भरणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 19 पैकी 13 जागा जिंकल्या. दौंडचे रासपचे आमदार ऍड. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला दौंडमध्ये एकही जागा मिळू शकली नाही. येथे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व 19 जागा जिंकल्या.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता; पण मतदारांनी त्यांना सपशेलपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. येथेही सर्वच्या सर्व 19 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्या.

Web Title: market committee election win ncp