‘युजर चार्जेस'साठी बाजार समितीचा प्रस्ताव; वर्षाला १५ कोटींचे उत्पन्न वाढणार

मार्केट यार्डातील भुसार विभागात विविध प्रकारच्या सुमारे ५००० हजारांपेक्षा जास्त वस्तू येतात.
APMC Pune
APMC PuneSakal
Summary

मार्केट यार्डातील भुसार विभागात विविध प्रकारच्या सुमारे ५००० हजारांपेक्षा जास्त वस्तू येतात.

पुणे - कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या भुसार विभागात ज्या वस्तूंवर बाजार फी (सेस) घेतली जात नाही. अश्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर एक टक्का ‘युजर चार्जेस' (वापर आकार) आकारण्यासाठी बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्फत राज्याच्या पणन संचालकांकडे प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे समितीचे वर्षाकाठी सुमारे १५ कोटींनी उत्पन्न वाढणार आहे.

मार्केट यार्डातील भुसार विभागात विविध प्रकारच्या सुमारे ५००० हजारांपेक्षा जास्त वस्तू येतात. यामध्ये फक्त ६०-६५ वस्तूंवरच ‘बाजार फी’ (सेस) आकाराली जात आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पादनात वाढ होत नव्हती. परंतु राज्य सरकारने कृषि माल नसलेल्या मालावर ‘युजर चार्जेस’ (वापर आकार) घेण्यासाठी कायद्यात बदल करून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सेस नसलेल्या मालांवर ‘युजर चार्जेस’ लावून उत्पन्न वाढविले जाऊ शकते. याच आधारे कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘युजर चार्जेस' (वापर आकार) लावण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.

गुळ भुसार विभागात दररोज २००-२२५ वाहनांमधून १०००-१५०० टन मालाची साधारणतः आवक होते. यामध्ये तेल, रवा, अटा, मैदा, सुकामेवा, डाळी यासह तांदळाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. २०१४ ला शासनाने सुकामेवा, रवा, अटा, मैदा, तेल, डालडा यासह विविध वस्तूंवरील बाजार फी (सेस) रद्द केली होती. त्यानंतर पुन्हा कायद्यात बदल झाल्याने बाजार आवारात येणाऱ्या अनियमित शेतीमालवर ‘युजर चार्जेस’च्या (वापर आकार) माध्यमातून समितीस उत्पन्न वाढणार आहे .

गुळ भुसार विभागातून मिळणारं ३५ कोटींचा सेस

सध्या भुसार बाजारातून वर्षाकाठी सुमारे १८- २० कोटींचा सेस जमा होतो. ‘युजर चार्जेस’ लागून झाल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन वर्षाकाठी सुमारे ३५ कोटींचा सेस जमा होईल असा अंदाज बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

डाळी, सुकामेवा शेतमाल नाही का?

बाजारात येणाऱ्या वस्तूंमध्ये डाळी, सुकामेवा, तेल यासह विविध वस्तू येतात. यावर बाजार फी घेतली जात नाही. तर यामध्ये तांदूळ, मासल्याचे पदार्थ यासह विविध वस्तूंवर सेस घेतला जातो. मग डाळी, सुकामेवा, तेल यासह विविध वस्तू शेतमाल नाही का? एकतर सर्व प्रकारच्या शेतमालावर बाजार फी घ्या किंवा सगळ्यांवरची काढून टाका. त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांना सामान न्याय मिळेल. असा प्रश्न एका ज्येष्ठ व्यापाऱ्याने उपस्थित केला.

बाजार समितीने अनियमित शेतमालावर एक टक्का ‘युजर चार्जेस' (वापर आकार) आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पादनात मोठी वाढ होईल.

- मधुकांत गरड, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com