Video : नाताळसाठी बाजारपेठ सजली

Cake
Cake

लाल रंगाच्या टोप्या, सांताक्‍लॉजच्या बाहुल्या, ख्रिसमस ट्रीच्या खरेदीला वेग
पुणे - लाल रंगाच्या टोप्या, विद्युत रोषणाई, जिंगल बेल जिंगल बेलचा सूर लावणाऱ्या सांताक्‍लॉजच्या बाहुल्या, ख्रिसमस ट्री, चॉकलेट व सजावटीच्या आकर्षक वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. वर्षाच्या अखेरचा हा सण मोठ्या जल्लोष आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी शहरातील चर्चच्या स्वच्छतेचे आणि सजावटीचे काम गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा असली तरी नव्या वर्षाचा आनंद घेऊन येणारा, हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांची लगबग बाजारपेठांमध्ये वाढली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डिसेंबर सुरू झाला की गुलाबी थंडीचे आगमन होते आणि आतुरता असते ती ख्रिसमसचा सण साजरा करण्याची. यंदा कोरोनामुळे विविध सण सोहळे ऑनलाइन पद्धतीत साजरे झाल्यामुळे, नागरिकांचा उत्साह कमी झाला होता. परंतु, टप्प्या टप्प्यांनी झालेल्या अनलॉकमुळे आता वर्षाच्या अखेरचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गाचा धोका वाढू नये, यासाठी नाताळनिमित्त कार्यक्रमांवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. 

कोरोनामुळे मालाची आवक कमी झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ ते ३० टक्‍क्‍यांनी खरेदीत घट झाली आहे. तसेच, खरेदीसाठी येणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या कमी असून, नागरिक सर्व खबरदारी घेऊन, खरेदी करत असल्याचे विक्रेते राकेश अगरवाल यांनी सांगितले. 

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
 
चर्चमध्ये सोशल डिस्टन्सिंग
कोरोनामुळे यंदा नाताळ हे सर्व नियम पाळून साजरा केला जाणार आहे. चर्चमध्ये लहान मुलांना आणि ज्येष्ठांना प्रवेश नसून, प्रार्थनांनासुद्धा ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. तसेच चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी चर्चमध्ये एका बाकड्यावर एकच व्यक्ती बसेल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे ‘चर्च ऑफ द होली नेम’चे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी सांगितले. 

वर्षातून एकदाच येणारा हा सण असल्यामुळे आम्ही नक्कीच हा सण उत्साहात साजरा करणार आहोत. तसेच नाताळच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थना घरीच करणार आहोत. त्यानंतर सकाळी चर्चला जाऊन, प्रार्थना करणार आहोत. येणारे नववर्ष कोरोनातून मुक्ती देईल, हीच भेट सांताकडून आपल्याला मिळेल, असा आमचा विश्‍वास आहे. 
- सरोज बालगोहर, ग्राहक 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com