मार्केट यार्ड पुनर्विकासाला अडत्यांची सहमती

मार्केट यार्ड पुनर्विकासाला अडत्यांची सहमती

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डच्या सुमारे साडेसातशे कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास अडत्यांनी सहमती दाखविली आहे. त्यासाठी अडत्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केले तर त्याला अंतिम मान्यता देणार असल्याचे मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. या प्रकल्पावर  बुधवारी (ता. २६) बैठक होणार आहे.

 बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीच्या गुलटेकडी येथील भाजीपाला, फळे विभागाच्या इमारतींचे आजवर दोन-तीन वेळा स्ट्रक्‍टरल ऑडिट केले असून त्यात ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल समोर आला आहे. काही भाग कोसळण्याची शक्‍यताही वर्तविली आहे. 

तत्कालीन प्रशासक मंडळाकडून भाजीपाला, फळे विभागाचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला होता. सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. प्रशासक मंडळाने आराखडा तयार करून अडत्यांची बैठक घेतली होती. त्या वेळी अडत्यांनी हा प्रकल्प हाणून पाडला होता. आता बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख जुन्या प्रकल्पात काही दुरुस्त्या करत, एक नवीन प्रकल्प म्हणून तो अडत्यांसमोर ठेवणार आहेत. त्यावर बुधवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

बाजाराच्या इमारतीचा काही भाग जीर्ण झाला असून काही भाग कोसळण्याची शक्‍यताही स्ट्रक्‍चरल ऑडिटच्या अहवालात वर्तविली आहे. त्यामुळे अडत्यांना विचारात घेऊन पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती, पुणे.

पुनर्विकासासाठी समितीने कळविले असून आम्ही सहमती दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी काही अटी व शर्ती ठेवल्या असून त्याला अनुसरून काम केल्यास अंतिम मान्यता देणार आहोत.
- विलास भुजबळ, अध्यक्ष,  श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com