पुणेकरांनो, लाॅकडाउनच्या काळात मार्केट यार्ड आणि उपबाजार सुरु की बंद राहणार ? वाचा सविस्तर

प्रवीण डोके
Friday, 10 July 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. अडते, कामगार, शेतकरी आणि सर्व घटकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र...

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये 13 ते 23 जुलै या कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार बाजार समितीचे सर्व बाजार बंद राहणार आहेत.

पुण्यात आता 'ही' सरकारी यंत्रणा होणार सुरु; ग्राहकांना मिळणार दिलासा    

देशमुख म्हणाले, पूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही बाजार सुरू असायचा. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. गुळ-भुसार, फळे, भाजीपाला आणि फुले विभाग बंद राहणार आहेत.

भुसार बाजार रविवारी सरू राहणार

सोमवारी 13 जुलै रात्रीपासून मार्केट बंद असल्याने भुसार बाजार रविवारी सुरू राहणार आहे. रविवारी भुसार बाजाराला सुट्टी असते. परंतु शहरातील आणि उपनगरातील खरेदीदारांना अन्नधान्य, किराणा माल खरेदी करता यावा. खरेदीदारांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून रविवारी भुसार बाजार चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटालाल ओस्तवाल यांनी सांगितली.

 

Edited by- Gayatri Tandale


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market yards and sub-markets will be closed during the lockdown