नेहरू युवा केंद्रातील युवक करणार शेतीमालाचे मार्केटिंग 

farmar.j
farmar.j

न्हावरे (पुणे) : ""शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करताना विक्री व्यवस्था अडचणीची ठरते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारचे नेहरू युवा केंद्र हे शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेशी लवकरच करार करणार आहे,'' अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे राज्याचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी दिली. 

नेहरू युवा केंद्राच्या राज्यातील शंभर युवकांनी शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेला नुकतीच भेट दिली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी आमदार अशोक पवार, नेहरू युवा केंद्राचे कर्नाटक राज्याचे संचालक निकम, प्रा. गोविंदराजे निंबाळकर, तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम, शैलेंद्र बेल्हेकर, स्नेहल पवार, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर उपस्थित होते. 
मानखेडकर म्हणाले, ""ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेने फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीने विक्री व्यवस्था तयार केली आहे. ही विक्री व्यवस्था आणखी बळकट केल्यास नक्कीच चांगला फायदा होईल. म्हणून नेहरू युवा केंद्राकडे असलेले राज्यातील युथ हे विक्रीसाठी मदत करतील. यासाठी या संस्थेशी करार करून विक्री व्यवस्थेला आणखी चालना दिली जाईल. त्यामुळे अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.' स्नेहल पवार यांनी प्रास्ताविक केले. तर स्नेहा जाधव यांनी आभार मानले. 
 
ग्रामीण तंत्रज्ञान संस्था ही फळे व भाजीपाला प्रक्रियेवर काम करणारी संस्था आहे. या संस्थेने आनंदघना नावाने शेतीमालाचा ब्रॅंड तयार केला आहे. हा ब्रॅंड आज पुणे, मुंबई, परराज्यात व परदेशात पोचला आहे. संस्थेने जवळपास 40 ते 45 उत्पादने तयार केली असून मुख्य दहा ते पंधरा उत्पादनांवर भर दिला आहे. 
- गीताराम कदम, अध्यक्ष, ग्रामीण तंत्रज्ञान संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com