विवाह संस्था ४५०० वर्षांपासून

दिलीप कुऱ्हाडे 
रविवार, 13 जानेवारी 2019

पुणे - हरियानामधील राखीगडी येथील दफनभूमीत केलेल्या उत्खननात इसवीसनपूर्व चार हजार ते साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या स्त्री व पुरुषाचे एकत्रित सांगाडे सापडले होते. या सांगाड्यांच्या सखोल संशोधनानंतर विवाह संस्थेची सुरवात ४५०० वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाने व्यक्त केला आहे.

राखीगडीचा परिसर चारशे हेक्‍टरचा आहे. येथील उत्खननात एका टेकडावरील दफनभूमीत दोन सुस्थितीतील २५ ते ३० वयोगटातील (स्त्री आणि पुरुष) सांगाडे सापडले होते. स्त्री सांगाड्याची उंची पाच फूट दोन इंच, तर पुरुष सांगाड्याची उंची पाच फूट पाच इंच आहे. 

संशोधकांनी या सांगाड्यांचा अभ्यास केल्यानंतर ते दोघे पती-पत्नी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांचा मृत्यू कोणत्याही रोगराईने किंवा त्यांना मारल्याचे दिसून आले नाही. त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा; तर दुसऱ्याचा मृत्यू जोडीदाराच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने झाला असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. 

‘मृत्यूनंतर दोघांना विधिवत एकाच ठिकाणी दफन करण्यात आले. उत्खननात पुरुष सागांड्याचा चेहरा स्त्री सांगाड्याच्या दिशेने, तर स्त्रीचा चेहरा आकाशाकडे होता. यावरून त्यांचे प्रेम दिसून येते. यासह येथील दफनभूमीत मृतदेहासोबत भांडी, स्त्रियांच्या गळ्यातील मण्यांची माळ, हत्यारे सापडतात. याचा अर्थ मृत्यूनंतर दुसरे जीवन असते; असा त्याकाळच्या लोकांचा समज असावा,’’ असे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी सांगितले.

मानवाच्या विकासाची माहिती कळणार
सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इसवीसनपूर्व अडीच ते दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये सिंधू संस्कृतीची सुरवात, भरभराट आणि समाप्ती कशी झाली, याचे नेमके उत्तर अद्याप सापडलेले नाही. राखीगडी येथे सापडलेल्या स्त्री-पुरुषाच्या सांगाड्यांत सापडेले ‘डीएनए’ अभ्यासासाठी अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील संशोधनानंतर लवकरच मानवाच्या विकासातील महत्त्वाच्या टप्प्याची माहिती कळणार आहे.

राखीगडी येथील स्त्री व पुरुष सांगाड्यांचा अभ्यास नुकताच पूर्ण झाला आहे. यावरून  साडेचार हजार वर्षांपूर्वी वैवाहिक जीवनाची परंपरा अर्थात विवाह संस्थेची सुरुवात झाली असण्याचा अंदाज बांधता येतो. असा सर्वांत प्राचीन पुरावा पहिल्यांदाच सापडला आहे.
- डॉ. वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज

Web Title: Marriage institution from 4500 years