सहकाऱ्याकडून विवाहितेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

विवाहितेसमवेत काम करणाऱ्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - विवाहितेसमवेत काम करणाऱ्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शुभम पाटील (वय २५, रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी एकाच सराफी दुकानामध्ये कामाला आहेत. संबंधित प्रकार कोणास सांगितल्यास मुलीस पळवून नेऊन तिच्यावरही बलात्कार करण्याची धमकी आरोपीने दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage rwoman rape from colleague