मनाविरुद्ध लग्न; बहिणींनी सोडले घर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पिंपरी - शिक्षण सुरू असल्याने मनाविरुद्ध लग्न करण्यास नकार देत एका मुलीने लग्नापूर्वीच पाच दिवस अगोदर घर सोडले. मात्र आई-वडिलांनी तिच्या लहान बहिणीशी लग्न करून देण्याची तयारी केली. लहान मुलीने मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत घर सोडण्याची तयारी केली. एवढेच नव्हे तर मोठ्या बहिणीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात अर्जही दिला आहे. यामुळे पोलिस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

भोसरीतील धावडे वस्ती परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने आई, वडील, मामा आणि आत्या यांच्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात मनाविरुद्ध लग्नासाठी दबाव टाकत अर्ज केला आहे. अर्जदार तरुणीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून भविष्यात उच्च शिक्षण घ्यायचे आहे. परंतु, नातेवाईकांनी लग्नाचा तगादा लावून कोणतीही पूर्वकल्पना न देता तिचा विवाह ठरविला. 

नियोजित वर आणि तिच्यामध्ये १४ वर्षांचा फरक आहे. ‘आम्हाला आमचे ओझे कमी करायचे आहे’ असे म्हणत आई-वडील तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे तिने अर्जात म्हटले आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी तिचा साखरपुडा केला. तर २२ एप्रिल २०१८ रोजी लग्नाची तारीख काढली. तिचा विरोध झुगारून लग्नपत्रिकाही छापल्या आहेत. 

नातेवाइकांची पंचाईत
रविवारी (ता. २२) मनाविरुद्ध लग्न होत असल्याने तिने मंगळवारी (ता. १७) आई-वडिलांचे घर सोडले आहे. दरम्यान, तिने लग्नाला नकार दिल्यामुळे लहान बहिणीचे तिच्या जागी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, तिनेही आपल्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेवर ठाम राहत घर सोडण्याचा पर्याय निवडला आहे. पाच दिवसांवर विवाह मुहूर्त असताना दोघीही गायब झाल्याने आई, वडील व नातेवाइकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: marriage sisters release home