खेड तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

राजगुरूनगर - पत्नीने माहेरवरून पैसे आणावेत यासाठी उपाशी पोटी ठेवून, शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना खेड तालुक्यातील वाफगाव येथील मांदळेवाडी येथे घडली. संशयित पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खेड पोलिसांनी दाखल केला आहे. 

संतोष नाथा मांदळे (मांदळेवाडी, वाफगाव, ता. खेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर रुपाली संतोष मांदळे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रुपालीचे वडील वामन नामदेव रोकडे (वाकी खुर्द, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी रुपाली हिचे आठ वर्षांपूर्वी संतोष मांदळे याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून तो रूपालीला वडिलांच्या वाटणीची जमीन विकून १२ लाख रुपये दे, नाहीतर घरात राहू नको, असे म्हणून वारंवार मारहाण करीत होता. तसेच उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करीत होता. शिवीगाळी करून धमकावत होता. शेवटी १९ जुलै रोजी तो दारू पिऊन रुपालीला मारहाण करीत त्यांच्या दोन मुलांसह वाकी येथे सोडून गेला. त्यानंतर २६ जुलै रोजी त्याने पत्नीला फोन करून आताचे आता घरी निघून ये, नाहीतर मी जीव देईन, अशी धमकी दिल्याने रुपाली २७ जुलै रोजी त्याच्याकडे गेली. त्यादिवशी रुपालीने माहेरी फोन करून सांगितले की, नवरा खेड कोर्टात आणून माझ्याकडे घटस्फोट मागत आहे. नंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर संतोष याने १ ऑगस्ट रोजी सासूला फोन करून रुपाली मेली असून तिला तुमच्याच घरी जाळून टाका असे सांगितले. 

संध्याकाळी वाकीच्या पोलिस पाटलाने रुपालीचा मृतदेह वाकी येथेच भामा नदीत तरंगत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी संतोषविरुद्ध पैशासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Marriage suicides in Khed taluka