पिंपरीत विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

राहत्या घरात गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.20) दुपारी पिंपरीगावात घडली. हेमा अविनाश कुदळे (वय 30, रा. स्वप्नपूर्ती निवास, पिंपरीगाव) असे विवाहितेचे नाव आहे. 

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.20) दुपारी पिंपरीगावात घडली. हेमा अविनाश कुदळे (वय 30, रा. स्वप्नपूर्ती निवास, पिंपरीगाव) असे विवाहितेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास हेमा यांच्या सासू चार वर्षीय नातवाला घेऊन नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यावेळी हेमा आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा घरी होते. हेमा यांनी छताच्या हुकाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच, त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हेमा यांचे पती पीएमपीमध्ये वाहक आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Married Woman Committed suicide in Pimpri

टॅग्स