कोरेगाव पार्क येथे विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली.

पुणे - चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली.

लिप्सा जितेंद्र साहा (वय 30) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रभानू दास (वय 59, रा. ओडिशा) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती जितेंद्र मुकेश साहा (वय 35, रा. आतुर पार्क, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी दास यांची मुलगी लिप्सा हिचा जितेंद्र याच्याशी 2016 मध्ये विवाह झाला होता. दरम्यान, त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरवात केली. तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्याबरोबरच मारहाण केली जात होती. मुलीला घेऊन जा; अन्यथा तिला मारून टाकण्याची धमकीही जितेंद्र याने दास यांना दिली होती. सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळून लिप्सा यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: married women suicide crime