फ्लॅटच्या रकमेसाठी छळ; विवाहितेची आत्महत्या 

फ्लॅटच्या रकमेसाठी छळ; विवाहितेची आत्महत्या 

पुणे - फ्लॅटसाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी सासरकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पर्वती दर्शन येथे सोमवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. 

गीता अतुल पाटोळे, असे विवाहितेचे नाव आहे. किशोर लोखंडे (वय 28, रा. भाळवणी, पंढरपूर) यांनी फिर्याद दिली. पती अतुल परमेश्‍वर पाटोळे याच्यासह त्याचे दोन भाऊ, आई व भावाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची बहीण गीता हिचा अतुल पाटोळे याच्याशी 2013 मध्ये विवाह झाला होता. पती खासगी बॅंकेमध्ये शिपाई म्हणून काम करतात. लग्न झाल्यापासूनच पती, सासू व त्यांचे कुटुंबीय गीता हिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. जाचास कंटाळून राहत्या घरी गीताने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक अनिता सूर्यवंशी तपास करत आहेत. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com