अल्पवयीन मुलीशी केले लग्न, पोलिसांनी आणले विघ्न

नवदांपत्याचे मधु इथे आणि चंद्र तिथे अशी झाली अवस्था
child Marriage
child MarriageSakal

नसरापूर - अल्पवयीन मुलीशी लग्न करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. मुलीला पळवुन नेऊन लग्न करुन पोलिस ठाण्यात हजर झाला. परंतु मुलीच्या आई वडीलांनी तक्रार मागे न घेतल्याने पोलिसांनी कारवाई करत मुलीला सुधारगृहात तर मुलाची पोलिस कोठडीत रवानगी केल्याने नवदांपत्याचे मधु इथे आणि चंद्र तीथे, अशी अवस्था झाली.

वेल्ह्यातील एका सज्ञान युवकाने भोर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एप्रिल महिन्यात पळवुन नेले. याबाबत मुलीच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. परंतु लग्न करून आलेले हे जोडपे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांच्या चौकशीत मुलीचे वय १७ वर्ष ८ महिने असल्याने ती अल्पवयीन ठरली व मुला विरुध्द अपहरणचा गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी कायद्याचे पालन करून दोघांनाही न्यायालयात हजर केले.

यावेळी मुलीने तिच्या आई-वडीलाकडे जाण्यास नकार दिल्याने बालकल्याण समितीच्या निर्णयानुसार मुलीला बालसुधारगृहात रवानगी करण्याचा निर्णय घेतला तर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बालविवाह केल्याने पॉस्को कायद्यांर्तगत संबंधित २६ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्न करून आलेल्या प्रेमी जोडप्याला एकत्र राहण्याची इच्छा असताना कायद्याच्या बडग्याने मुलीला बालसुधारगृहात तर युवकाला तुरुंगवास भोगावा लागल्याने मधु इथे व चंद्र तिथे अशी दोघांची अवस्था झाली आहे.

या प्रकरणी आर्थिक लालसेपोटी लग्नाचे वय नसतानाही अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न लावणाऱ्या विवाह संस्था,भटजी, व मदत करणाऱ्यावर देखील चौकशी करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी सांगितले आहे. राजगड ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी या बाबत बोलताना मुला मुलींनी पळुन जाऊन लग्न करताना आई वडीलांचा विचार करणे गरजेचे आहे तो विचार होत नाही तसेच काही अल्पवयीन कायद्याचे पालन करत नाही मात्र वय नसताना केलेल्या या धाडसाने त्यांना कायद्यानुसार कारवाईला तोंड द्यावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com