नदीकाठाचा विकास मेपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे - मुळा-मुठा नदीकाठ विकसन व संवर्धन योजनेला येत्या महिनाभरात केंद्रीय पर्यावरण खाते आणि राज्याच्या पाटबंधारे खात्याची परवानगी मिळेल. त्यानंतर मे महिन्यात योजनेची प्राथमिक कामे सुरू होतील.  

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून वाहणाऱ्या या नद्यांच्या काठाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार असून, पुढील वर्षात ते पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. 

या योजनेतील कामांची आखणी, ती पूर्ण करावयाचा कालावधी, त्यांची परिणामकारकता, खर्च आणि निधीची उपलब्धता याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

या नद्यांच्या काठाचे विकसन आणि संवर्धन करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २ हजार ६१९ कोटी रुपये खर्च येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यांतील कामांसाठी स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) नेमण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे योजना राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून, योजनेच्या सविस्तर आराखड्याचा मसुदा तयार केला आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरण खाते आणि पाटबंधारे खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याबाबत दोन्ही यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असून, या महिनाअखेरीला परवानगी मिळेल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही कुणाल कुमार यांनी सांगितले.

योजनेचा मुख्य उद्देश 
शहरातून वाहणाऱ्या या दोन्ही नद्यांची पूरवहन क्षमता वाढवून, नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सुरक्षितता पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील शंभर वर्षांचे नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार नद्यांचे काठ, पात्र विकसित करण्यात येणार आहेत. तसेच, नदीसुधार योजनेच्या धर्तीवर दोन ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येतील. ज्यामुळे नद्यांलगतच्या गावांमधून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होईल. नद्यांभोवतीच्या लोकवस्तीतून येणारे सांडपाणी रोखणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या कामांसाठी नद्यांच्या परिसरात ३० ठिकाणांचा सर्व्हे केला आहे. त्यानुसार उपाययोजना करून नदीची सुरक्षितता, स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात 
आल्या आहेत.

काय होणार योजनेत 
नद्यांच्या काठाचे सुशोभीकरण (विशेषत: वॉकिंग ट्रॅक, छोट्या बागा, सायकल मार्ग)  
नागरिकांना नद्यांशी जोडण्यासाठी नद्यांवरील पुलांची संख्या वाढणार 
नदीत नागरिकांसाठी बोटिंगची सोय 
नदीपात्र ओलांण्यासाठी नवी २७० ठिकाणे (त्यात, जिने, रॅम्प असतील) 
गणेश विसर्जन घाट  (नवे ३९, सध्या २०) 

Web Title: marthi news river mula-mutha riverr pune