शहीद फराटे यांच्या पत्नीला नोकरी देणार - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

फुरसंगी - खासदार सुप्रिया सुळे यांनी शहीद सौरभ फराटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. फराटे यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत लावण्याचे व त्यांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचे आश्‍वासन या वेळी त्यांनी दिले. 

शहीद सौरभ यांचे आई-वडील, पत्नी व भावाबरोबर सुळे यांनी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.  सुळे म्हणाल्या, की सौरभ यांच्या मुलींच्या शिक्षणाची, तसेच त्यांच्या पत्नीला नोकरी देण्याची जबाबदारी मी स्वतः घेते. मुली शिक्षणाच्या वयाच्या होतील, त्या वेळी हडपसर येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये त्यांच्या सर्व शिक्षणाची मोफत सोय केली जाईल.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व मुख्यमंत्र्यांशी बोलून सौरभ यांच्या पत्नीला सरकारी नोकरीत घेण्यासाठी प्रयत्न करेन, असेही त्या म्हणाल्या. या वेळी ॲड. अमोल कापरे यांनी फराटे कुटुंबीयांना दहा हजारांचा धनादेश सुपूर्द केला.

Web Title: Martyr farate wife to give the job